कॉम्प्युटरसॅव्ही आदर्श नागरी पतसंस्था…

आनंद कोळगावकर

परवाचीच घटना. एका राष्ट्रीयकृत बँकेत गेलो होतो. कोअर बँकींगमुळे आमच्या कुठल्याही शाखेत जावून व्यवहार करू  शकता, अशी जाहिरातच ते करत होते. परंतु त्या बँकेचा स्टाफ मात्र या बाबतीत अनभिज्ञ होते. तसाच वैतागुन बाहेर आलो नी वाटेतच आदर्शचे चेअरमन सुरेश पाटील भेटले. साहजिकच त्यांना मी ही घटना सांगितली. त्यावर त्यांनी नुसतं स्मितहास्य केलं. नी म्हणाले, चल वर जावू आदर्श पतसंस्था दाखवतो. एखाद्या पतसंस्थेचे हेड ऑफीस एवढे पॉश असू शकते !…..अगदी एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या ऑफिससारखे!  सारा माहोलच टॉप रेटेड इंटिरीयर  डिझाईन केलेला. अध्यक्षांची केबीन, संचालकांच्या केबीन्स, डायरेक्टर्स मिटींग रूम वगैरे तर होतेच. पण स्टाफसाठीच्या केबीन्सही अगदी व्यवस्थित डेकोरेट केलेल्या. कुठल्याही ऑफीसची संस्कृती ही त्यामधील टॉयलेटवर ठरत असते असं म्हणतात. इथली टॉयलेटही अतीशय टीपटॉप !  इंटीरीयर मधील निवडलेल्या मटेरीयल आणि रंगसगती यामुळे सारेच कसे निटनेटके आणि भारी वाटत होते. स्वत: सुरेश, अभिजित व सर्व संचालक या सर्वांची निवड करताना बारीकसारीक तपशीलाचा अभ्यास करून बनवून घेतले आहे.

पूर्वीपासूनच वाटायचं की आदर्श म्हणजे सुरेशचा एकखांबी तंबू आहे. सुरेशने आता आपल्या जबाबदार्‍या दुसर्‍यांंवर सोपविण्याची गरज आहे. माझी ही शंका मी बोलून दाखवलीच. सुरेशने लगेचच आदर्श पतसंस्थेचे अडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चरल  सांगितले. आज आदर्शच्या जवळपास तेरा-चौदा शाखा आहेत. यासाठी त्यानी दोन रिझनल मँनेजर ची नेमणूक करून अर्बन व रूरल शाखांचे विभाग करून 6 व 7 शाखा त्या-त्या विभागप्रमुखाला दिलेल्या आहेत. शाखा  मनेजर यांनी त्यांना रीपोर्ट करायचा व शेवटी CEO नी अध्यक्षांना रिपोर्ट करायचा. ऑफीसमधील जनरल मॅनेजरला. मी जरी दहापंधरा दिवस इथे नसलो तरी संस्थेच्या दररोजच्या कामकाजात काहीही फरक पडत नाही सुरेश सांगत होता. प्रत्येक अधिकार्‍याला संस्थेच्या अधिनियमात राहून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. फक्त पॉलिसी ठरविण्याचे काम संचालक मंडळ करते.  एकंदरीत, आदर्श पतसंस्थेच्या प्रशासकीय कामकाजात Pyramid Administration. structure चांगलच मुरलंय. ऐकून खरंच समाधान वाटलं……पण तरीही माझ्या मनात एक शंका राहीलीच.  एवढ्या शाखांच विणलेलं जाळं तिथला कर्मचारी आणि तिथले कामकाज, यावर अध्यक्ष म्हणून कंट्रोल कसा बरं ठेवत असेल? याचं सुरेश पाटील यांनी दिलेलं तांत्रिक उत्तर मात्र मलाच थक्क करणारे ठरले.

हल्ली  छोटी-छोटी ऑफीसेस देखील संगणक वापरतात. पतसंस्थांसाठी तर वेगवेगळी सॉफ्टवेअर निघाली आहेत. बचत, रीकरींग, मुदत ठेवी, पिग्मी, कर्ज अशा खात्यांमधील व्याज आकारणी वगैरै गणिती गोष्टी संगणकाद्वारेच होतात. आदर्शनेही हे सारं नॅचरली आत्मसात केलंच आहे. पण या व्यतिरीक्त वेगळं काय ? असा प्रश्‍न जेंव्हा विचारला, तेंव्हा मात्र आदर्श पतसंस्था इतरांपेक्षा वेगळी कशी,हे पटलं.
कोकणामधील आदर्श एकमेव अशी पतसंस्था आहे की, ज्या संस्थेच्या  टठ लेवश चे माध्यमातून छोटे मोठे व्यवसायिकांना व्यवहार करता येतात.   व ग्राहकांना स्वतःच्या मोबाईल अ‍ॅप दिलेले असून  अ‍ॅपद्वारे तुम्ही पैसे खात्यात भरू शकता, काढू शकता किंवा दुस-या खात्यात ट्रान्सफरदेखील करू शकता. या शिवाय रू.पन्नास हजारापर्यंत NEFT करू शकता, लाईट, फोन, डीश रीचार्ज  है सारं आपण घर बसल्या करू शकता.RTGS, NEFT प्रमाणेच IMPS सर्व्हिस लवकरच चालू करणार आहोत.

QR Code outgoing सेवा लवकरच चालू होणार असून त्याद्वारे online खरेदी घरबसल्या करता येणार आहे. लवकरच एस एम एस बँकिंग प्रमाणे व्हाट्सअप्प बँकिंग सेवा  चालू करणार आहोत. अद्यावत असे मोबाईल बँकिंग अँप संस्थेने चालू केले असून सर्व खातेदारांनी त्याचा लाभ घ्यावा. i Phone धारकांना लवकरच वेगळे मोबाईल बँकिंग अँप आदर्श देणार आहे. आदर्शच्या IFSC Code द्वारे भारतातील कोणत्याही बँकेत आता पैसे ट्रान्सफर करता येतात. त्याचप्रमाणे आदर्शच्या आपल्या बचत खात्यामध्ये भारतातील कोणत्याही बँकेतून पैसे ट्रान्सफर करता येतात. हे सर्व शक्य झाले ते IFSC Code द्वारे. आदर्शचे जवळपास 31,421 बचत खातेदार आहेत, शिवाय कर्ज व इतर खाती  वेगळी. भविष्यात अजून वाढतीलही. या सर्वांना सेपरेट QR Code facility देण्याची संगणकीय क्षमता आदर्शची आहे.

आजमितीला आदर्शची आर्थिक उलाढाल जवळपास 430 कोटींची आहे. कोट्यावधींची कर्जे, ठेवी… हा सारा डाटा  ऑपरेट करण्यासाठी Cloud base (TR4 system) प्रणालीचा वापर केला आहे. जर एक डेटा सेंटर बंद झाले तर लगेचच दुसर्‍या डेटा सेन्टरवरून सिस्टम लगेच चालू केली जाते. त्यामुळे कस्टमरची गैरसोय होत नाही. तसेच प्रत्येक शाखेला दोन इंटरनेट कनेक्शन असल्यामुळे एखादे कनेक्शन बंद झाले तरी दुसर्‍या कनेक्शनवरून लगेच सिस्टीम चालू केली जाते.

कुठल्याही पतसंस्थेचा ग्राहक हा प्रामुख्याने चाळीसच्या वयोगटातील असतो. हा ग्राहक, संस्थेची प्रामाणिकता, सचोटी या गुणांमुळे संस्थेने कमाविलेला असतो. आदर्शने आजवर तो विश्‍वास कमावलेलाच आहे. परंतु आजकालच्या मोबाईल क्रांतीमुळे अठरावीस वयोगटातील ग्राहकाला आकर्षित करायचा असेल तर, अत्याधुनिक संगणकीय कामकाजाशिवाय पर्याय नाही. संस्थेचे संचालक अभिजीत पाटील यांनी हे बरोबर ओळखले आणि संस्थेला तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या नवे परीमाण दिले…….mobile transaction. त्यामुळे आता तरूण वर्गही घरबसल्या आदर्शमध्ये व्यवहार करू शकतोय. या अर्थाने, आदर्श पतसंस्था ही सर्व बँकाना जोडली गेली आहे , असं म्हटल्यास वावगं ठरू नये. संस्थेला स्वतंत्र ICICI बँकेअंतर्गत IFSC Code मिळाला त्यामार्फत सुरळीतपणे व सुरक्षित व्यवहार सुरु आहेत. असे  समजावून सांगितले, तरी माझी शंका तयारच होती. कुणी कितीही काही म्हणो, परंतु आमची पिढी मोबाईल बँकींगवर थोडीशी insecured feel करते. कष्टाचा पैसा गेला तर नाना शंका ! पण आदर्शने आठ स्तराची सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.

Centralized anti virus system,  तसेच अद्यावत firewall system असल्याने व्हायरस काय कुणीही करू शकत नाही. तसेच unauthorized entry असल्याने biometrics authentication करणे हॅकर्सनाही एवढं सोप नाही. होणारे प्रत्येक online transaction हे तपासले जातात. approve केले जातात. त्यामुळे पैसे जाण्याची शंकाच निराधार आहे. कॉम्पुटराईज्ड आदर्श पतसंस्था, यासाठी स्वत:चे कॉम्पुटराईज्ड कॉल सेंटरही सुरु केले आहे. यामध्ये आदर्शचे ठेवींवरील व्याजदर, कर्ज व्याजदर, संस्थेच्या विविध स्कीम्स आणि आदर्शबद्दलची सारी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.

 आदर्शचा अजून एक  पैलू, पेपरलेस वर्किंग सारे कामकाज cloud base असल्याने, पर्यायी हार्ड कॉपीची तशी गरजच नाही. त्यामुळे मोठमोठी लेजर्स यांना आपोआप फाटा दिला जातो.  एवढेच कशाला, पिग्मी एजंटनाहीmobile pigmy app दिल्याने पिग्मीही online घेतली  जाते. आणि घेतल्यानंतर ताबडतोब त्वरीत त्याची मेसेजेस वरूनonline receipt ही दिली जाते. संगणीकीकरणाचा हाही एक फायदा !

आदर्शचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या केबिनमध्ये अजून एक प्रात्यक्षिक बघायला मिळाले. सर्व तेराच्या तेरा शाखा सीसीटिव्हीने जोडल्या असल्याने, या शाखांमध्ये या घडीला काय चाललेय हे सारं चेअरमन सीसीटिव्हीवर बघू शकतात. हे म्हणजे अगदीच भारी हं !  कर्मचा-यांची हजेरीही ऑनलाईन थम इंप्रेशनने असल्याने, हजेरीपट नावाची भानगडच नाही.  पगारसुध्दा ऑनलाईन पध्दतीने डायरेक्ट खात्यामध्ये जमा होतो. हे ही मस्त ! असो.

चेअरमन सुरेश पाटील यांची कार्यपध्दती बरीचशी धडाकेबाज असल्याने, त्यांनी या संगणिकीकरणाचा पॉझिटिव्ह उपयोग करून घेतलेला दिसतोय. अर्थात या कामी त्यांना संचालक अभिजित पाटील यांचे व्हिजन उपयोगी पडलेय.  चेअरमन सुरेश पाटील यांनी त्यांचा वारसदार परफेक्ट निवडलाय याची खात्री पटली.

online transactions मुळे आता आदर्श नागरी पतसंस्थेकडे तरूण वर्ग जास्त आकर्षित होईल यात मात्र शंका नाही. संस्थेने H R Department चालू केले असून कर्मचारी भरती तसेच कर्मचारी वर्गाच्या समस्या या विभागाद्वारे सोडवल्या जातात. आदर्शच्या जडणघडणीत संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सतिश प्रधान व सचिव श्री. कैलास जगे तसेच सर्व संचालक यांचा मोलाचा वाटा आहे. मित्रवर्य सुरेश पाटील यांच्या कार्यपध्दतीबद्दल अनेकवेळा लिहीलय. परंतु आज थोडं Computer savy आदर्श नागरी पतसंस्थेच्या बद्दल लिहीलं. कारण, आदर्श नागरी पतसंस्था म्हणजेच सुरेश पाटील हे समीकरण लोकमान्यच आहे. आज चेअरमन सुरेश पाटील यांचा 70 वा वाढदिवस. या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

Exit mobile version