| गोवे-कोलाड | वार्ताहर |
राज्यातील 8000 संगणक शिक्षकांना केंद्र शासनाने आयसीटी योजने अंतर्गत माध्यमिक शाळेत संगणकाचे ज्ञान देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून संगणक प्रयोग शाळा उभारल्या गेल्या आहेत. त्या करीता कंपनीतर्फे पाच वर्षा करीता संगणक शिक्षकांची नियुक्ती केली. 2019 साली राज्यतील सर्व आयसीटी लॅबमध्ये कंपनी करार संपुष्टात आल्यामुळे हजारो संगणक शिक्षक बेरोजगार झाले. लाखो गोरगरीब विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. लाखो रुपयांचे खर्च करून देखील या लॅब धूळखात आणि नादुरुस्त अवस्थेत पडल्या आहेत. तरी या संगणक शिक्षकांना मानधनावर सामावून घ्यावे, असा प्रस्ताव देखील शालेय शिक्षण विभागाला सादर झाला आहे. परंतु अद्याप निर्णय झाला नाही. त्या करीता शिक्षण मंत्री आणि सचिवां मार्फत आदेश निर्गमित करून नियुक्ती मिळावी आणि महाराष्ट्रातील गोरगरिबांना विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे डिजिटल महाराष्ट्र घडवावा अशा मागणीचे निवेदन संगणक आयसीटी शिक्षक संघाचे जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संगणक शिक्षक हितेश गुरव, प्रसाद सुतार, सांजाली महाबळे, प्राजक्ता वाळंज हे उपस्थित होते.