कोमसाप अलिबाग शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर

| अलिबाग | वार्ताहर |
अलिबागमधील पत्रकार भवन येथे रायगड जिल्हा कोमसाप अध्यक्ष सुधीर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१८) नवीन कार्यकारिणी निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते कार्यकारिणी निवडण्यात आली . या कार्यक्रमात महाड कोमसाप शाखेचे ज्येष्ठ सदस्य अ. वि. जंगम देखील उपस्थित होते. नूतन कार्यकारिणी निवडीपूर्वी जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांनी कोमसापचे कार्य, मधू मंगेश कर्णिक यांची कोमसाप स्थापनेमागची भूमिका, आगामी उपक्रम याबद्दल मनोगत व्यक्त केले. तर, कोमसापच्या माजी अध्यक्षा पूजा वैशंपायन यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.

कोमसापच्या जाहीर करण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणीनुसार अध्यक्ष सुजाता पाटील, उपाध्यक्ष निर्मला फुलगावकर, सचिव रवींद्र थळे, सहसचिव नंदू तळकर, खजिनदार नागेश कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य किशोर म्हात्रे, श्रुती राजे, वर्षा दिवेकर, संध्या कुलकर्णी, शारदा धुळप, वैशाली भिडे, पूजा वैशंपायन, जिल्हा प्रतिनिधी रमेश धनावडे तर, युवाशक्ती प्रमुख किशोर म्हात्रे हे आहेत.

Exit mobile version