ओमिक्रॉनने वाढवली चिंता

भारतात आढळले 11 सबव्हेरिएंट

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने परदेशातून येणार्‍या प्रवाशांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यास सुरूवात केली आहे. या तपासणी दरम्यान परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनचे 11 सबव्हेरिएंट आढळूल आले आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

24 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान एकूण 19,227 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 124 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर या सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव वेगळे ठेवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पॉझिटिव्ह आढळून आलेल्या संक्रमित रूग्णांमध्ये ओमिक्रॉनच्या सबव्हेरिएंटच्या 11 प्रकारांची पुष्टी करण्यात आली आहे. ज्यात XBB व्हेरिएंटचादेखील समावेश आहे. सध्या या व्हेरिएंटने जगभरात थैमान घातले आहे. भारतीय लसीचा या व्हेरिएंटवर लक्षणीय परिणाम दिसून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Exit mobile version