| पेझारी | वार्ताहर |
कोकण एज्युकेशन सोसायटीचे लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालय, पेझारी व नागरी संरक्षण दल उरण-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते दत्ता पाटील यांच्या जयंतीनिमित्त 4 ते 10 मार्च या कालावधीत संपन्न झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप रविवारी (दि.10) को.ए.सो. लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालय-पेझारी येथील सुलभाकाकू सभागृहात मनोहर म्हात्रे यांच्या उपस्थितीत व महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.संगीता चित्रकोटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी(दि.4) माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कालावधीत नागरी संरक्षण दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विविध तज्ज्ञ व्यक्तींनी प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा समारोप रविवारी (दि. 10) मनोहर म्हात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी म्हात्रे यांनी 39 नागरी संरक्षणदलाचा नागरिकांनी प्रसार व प्रचार केला पाहिजे तसेच, देशसेवेसाठी प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे असे प्रतिपादन केले. या प्रशिक्षण शिबिरात एकूण 48 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतले. यावेळी त्यांना नागरी संरक्षण दलाची कर्तव्यदक्षतेबाबतची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात निकिता झेले, सुहानी पाटील, प्रकाश म्हात्रे, दामोदर पाटील, उल्हास कुवळेकर, अनिल पाटील, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात डॉ.संगीता चित्रकूटी यांनी आपण जे प्रशिक्षण घेतलेले आहे त्याचा वापर राष्ट्रकार्यासाठी झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने सदैव सतर्क राहिले पाहिजे असे आवाहन केले.
समारोप प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे संयोजक डॉ. अनिल बांगर यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रशिक्षण कार्यशाळेसाठी निशिता झेले, सुहानी पाटील, प्रा.महेश बिराडे, डॉ.भटू वाघ, प्रा.दिलीप सोनावणे, प्रा.संतोष बिरारे, डॉ. दिलीप पाटील, ज्योत्स्ना पाटील, समीर पाटील, जयवंत भालेकर, सारिका म्हात्रे, निलेश कुलाबकर शिक्षकेतर कर्मचारी, आदीने परिश्रम घेतले.