| रायगड | प्रतिनिधी |
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबवण्यात येतात. लाभार्थ्यांना 10 हजार रुपयांचे अनंदान देण्यात येत होते. आता 50 हजार रुपये करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकत्याच काढण्यात आला आहे. राज्य शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना व बीज भांडवल योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
50 टक्के अनुदान योजना
प्रकल्प मूल्य, सद्य:स्थितीतील योजना 50 हजार रुपये, वाढीव अनुदानानुसार योजना 50 हजार रुपये, महामंडळाचा सहभाग 10 हजार रुपये, प्रकल्प मुल्याच्या 50 टक्के (25 हजार रुपये) अनुदान, 40 हजार रुपये बँकेचे कर्ज, 50 टक्के (25 हजार रुपये) बँकेचे कर्ज, व्याज दर, बँकेच्या नियमाप्रमाणे, परतफेडीचा कालावधी 3 वर्ष असणार आहे.
बीजभांडवल योजना : महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भागभांडवलामधून बीजभांडवल योजना राबविण्यात येते. प्रकल्प मूल्य, सद्य:स्थितीतील योजना पाच लाख रुपये, वाढीव अनुदानानुसार योजना पाच लाख रुपये, महामंडळाचा सहभाग, 20 टक्के (10 हजार रुपये अनुदानासहीत ) (90 हजार रुपये महामंडळाचे कर्ज अधिक 10 हजार रुपये अनुदान), 20 टक्के (50 हजार रुपये अनुदानासहीत) (50 हजार रुपये महामंडळाचे कर्ज अधिक 50 हजार रुपये अनुदान), बँकेचा सहभाग-75 टक्के (3 लाख 75 हजार रुपये बॅकेचे कर्ज), 75 टक्के (3 लाख 75 हजार रुपये बॅकेचे कर्ज), अर्जदाराचा सहभाग, 5 टक्के (25 हजार रुपये), 5 टक्के (25 हजार रुपये), व्याज दर 4 टक्के, महामंडळाचे कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्ष आहे.







