| खारेपाट | प्रतिनिधी |
आवास येथे कृषक महोत्सवाची सांगता सोमवारी झाली. दि. 6 पासून सुरू झालेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, सांगता समारोहप्रसंगी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कला सादर करणार्या सायली शिंत्रे तळवळकर प्रस्तुत इंडिरूट्स (इंडियन फ्युजन बँड) चे मंडळी व कोरस यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायिका सायली शिंत्रे तळवळकर हिने शिव तांडव, श्री गणेश स्तुती, सूर निरागस, लावणी, कोळीगीत, राग हंसध्वनी तराना व बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या अभंगाने कार्यक्रमाची सांगता केली. गायिका कलावंत शिंत्रे यांचे स्वागत अॅड. प्रदीप नाईक, सरपंच अभिजीत राणे आणि योगेश म्हात्रे आदी मान्यवरांनी केले. हजारो रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.