वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोप

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
भारतीय बौद्ध महासभा तालुका पेण अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली आषाढ पौर्णिमा ते आश्‍विन पौर्णिमा अशी तीन महिने सुरु असलेल्या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोप पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे,संतोष जाधव, किर्ती कुमार कळस, चंद्रकांत अडसुळे, प्रकाश कांबळे, एम. जी. शिंदे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी बेणसे ग्रामस्थांच्यावतीने चंद्रकांत अडसुळे यांच्या हस्ते चंद्रका सानावणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष जाधव, किर्ती कुमार कळस,अ‍ॅड.प्रकाश कांबळे, एम.जी. शिंदे, भगत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी भगवान शिंदे, संतोष अडसुळे, नरेश कायकवाड, मंगेश कांबळे,विजय सुर्वे भास्कर सुर्वे, गोपाळ सोनावले, भास्कर कांबळे, सुनिल खरात, बेणसे ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था ग्रामस्थ बेणसे यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन सचिन कांबळे यांनी केले. शेवटी चंद्रकांत अडसुळे यांनी सर्वांचे आभार माणुन कार्यक्रमाचा समारोप झाला.

Exit mobile version