| पाली/बेणसे | वार्ताहर |
सुधागड तालुका बौद्धजन पंचायत मुंबई यांच्या वतीने 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन व चक्रवर्ती सम्राट अशोक विजया दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह पाली या ठिकाणी धम्म मेळावा पार पडला. यावेळी पाली शहरातून धम्म ध्वज व निळे झेंडे हाती घेऊन रॅली काढण्यात आली. भगवान शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास अलोट गर्दी उसळली होती.
यावेळी धम्म प्रवचनकार आणि बौद्धचार्य गणांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भगवान शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी छनक शिर्के, सदानंद गायकवाड, नितीन जाधव, दिलीप मोरे, मनोहर मोहिते, दीपक पवार, राहुल सोनावले, रवींद्रनाथ ओव्हाळ, नरेश शिंदे, अशोक वाघमारे बौद्धचार्य, भिम महाडिक, नारायण जाधव, के.टी. गायकवाड, संतोष जाधव, राजेश जाधव, मोरेश्वर कांबळे, नूतन नरेश शिंदे, वंदना गायकवाड, नीता कांबळे, अस्मिता कांबळे, कीर्ती क्रांती कदम, श्वेता जाधव, वनिता शेलार, रोहिणी जाधव, संजीवनी जाधव, मयुरी मोरे, प्रांजल भालेराव, मनीषा कांबळे आदींसह धम्म बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश गायकवाड यांनी केले.