| अलिबाग | प्रतिनिधी |
खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील धोलपाला येथील समाजमंदिर ते गावाचे टोक या 150 मीटरच्या सिमेट रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ बुधवारी माजी जि.प.सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी उपसरपंच अशोक थळे, माजी सरपंच नाशिकेत कावजी,संतोष गुरव,तंटामुक्ती अध्यश्र विलास वालेकर, नरेश गोंधळी, सदस्या वैदेही थळ,सविता पाटील, रविंद्र पाटील, संजीव पाटील, विलास थळे यांच्या उपस्थितीत श्रीपळ वाढवून करण्यात आले.या कार्यक्रमस संकेत वेळे,किशोर खराडे,अशोक वेळे,सुरेंद्र वेळे,जितेंद्र थळे, संग्राम थळे, आर्यन घरत, नेत्रा घरत, जयश्री थळे, कल्पना वेळे, शिरीष थळे, वसंत कावजी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.