। उरण । वार्ताहर ।
मुंबई शहराकडे जाणार्या अटल सेतू, उलवे नोड, आणि रेल्वे स्टेशनला जोडणार्या जासई नाका ते गव्हाण गाव या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उप अभियंता नरेश पवार यांनी काँक्रीटकरण करण्याचे काम हाती घेतल्याने प्रवासी नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई शहराकडे जाणार्या अटल सेतू, उलवे नोड, आणि या ठिकाणावरील रेल्वे स्टेशनला जोडणार्या जासई नाका ते गव्हाण गाव या मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात मोठं मोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे या मार्गावरून जाताना वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, शेकापचे युवा नेते रमाकांत म्हात्रे यांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच, रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याची मागणी देखील करण्यात आली होती.
त्या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उप अभियंता नरेश पवार यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेतला.आणि के.एन. घरत या कंपनीच्या माध्यमातून या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू केले. हा रस्ता खड्डेमुक्त झाल्याने वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त करत या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेणार्याचे आभार व्यक्त केले आहेत.