नेरळ-कळंब येथे काँक्रीटीकरण सुरू

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब दरम्यानच्या नादुरुस्त रस्त्यावर डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण कामला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावर नेरळ-कळंब दरम्यान 900 मीटर अंतरावर सिमेंट काँक्रीटीकरण आणि तीन किलोमीटर लांबीचा रस्ता डांबरीकरण केला जाणार आहे. माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्याच्या नेरळ-कळंब भागातील 12 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. या रस्त्यासाठी अनेकदा उपोषणे झाली असून रस्त्याच्या कामासाठी वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलने झाली आहेत. ते लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे, त्यानंतर याच महिन्यात रस्त्याच्य्या कामाचे भूमिपूजन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले होते. या रस्त्यावर 900 मीटर अनंतरवरील रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनविला जाणार आहे. तर त्या पुढील 11 किलोमीटर रस्त्यातील खराब रस्त्यांपैकी तीन किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करून तयार केला जाणार आहे. सध्या या रस्त्यातील कोल्हारे साई मंदिर पासून कळंब कडे जाणार्‍या रस्त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण काम केले जात आहे. या रस्त्याचे काम सुरू असताना शाखा अभियंता अक्षय चौधरी यांच्याकडून सतत पाहणी केली जात आहे.

Exit mobile version