| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद हद्दीला लागून असलेल्या ज्ञानदीप सोसायटी व हालीवली गावातील काँक्रीट रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम.महेंद्र थोरवे यांनी काँक्रीट रस्त्यासाठी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच त्या सोसायटीच्या समोरच असलेल्या हालीवली गावातील रस्त्यासाठी सुद्धा 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
सोसायटीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अमर मिसळ, पंकज ओसवाल, पंकज पाटील, संतोष सांबरी, बबन गायकर, अर्जुन राणे, विकास बडेकर, बिपीन बडेकर, संदीप बडेकर, पंकज पाटील, प्रसाद थोरवे, दिलीप पाटील ,दीपक बोराडे, विजय हांडे, केतन बोराडे, राजेंद्र बोराडे, संतोष बोराडे ,निल होजगे, राजेंद्र जाधव, किरण सावरे, शिवाजी दातीर, प्रकाश शिंदे, हरिश्चंद्र धनवी, महेंद्र देशमुख, कैलास बोडके, महेंद्र पिंगळे, योगेश चोळकर, हितेश म्हात्रे, मच्छिंद्र जाधव, वीणा गुजराथी, संगीता जाधव आदी उपस्थित होते.