| उरण | वार्ताहर |
हेटवणे ते नवी मुंबई या मार्गावरील सिडको प्रशासनाची जलवाहिनी फुटून नुकसान झालेल्या दिघोडेतील नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष अनंत पाटील यांनी उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
सोमवारी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मिलिंद पाडगावकर, किरीट पाटील, रामनाथ पंडित, प्रकाश पाटील, विनोद म्हात्रे, रेखा घरत, निर्मला पाटील, मार्तंड नाखवा, बबन कांबळे, विनोद पाटील, श्रेयश घरत, विवेक म्हात्रे, कीर्ती ठाकूर, रंजित ठाकूर, अफशा मुकरी, सदानंद पाटील, मंगेश म्हात्रे आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपोषण स्थळी उपस्थित होते. या उपोषणाला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून ही समस्या त्वरित मार्गी न लागल्यास उपोषण अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.