शेकापचे हेमंत ठाकूर यांना मातृशोक

| अलिबाग | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील यशवंतखार येथील पार्वती महादेव ठाकूर यांचे सोमवारी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्या 96 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीने मुले, दोन मुली अशी 5 अपत्ये असून, 15 नातवंडे, 16 पतवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते तथा रायगड जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, पांडूरंग ठाकूर, रघुनाथ ठाकूर यांच्या त्या मातोश्री होतं.

पार्वती ठाकूर यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंत्ययात्रेला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने ठाकूर कुटुंबियात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दशक्रिया विधी बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी तिर्थक्षेत्र हरिहेश्वर येथे आणि उत्तरकार्य शुक्रवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी राहत्या घरी यशवंतखार येथे होणार असल्याची माहिती ठाकूर कुटूंबियांकडून देण्यात आली.

Exit mobile version