| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील कंठवली येथील ताईबाई महादेव ठाकूर (72) यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक बी. एम. ठाकूर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. मनीष पाटील, राजिपचे सदस्य अविनाश ठाकूर त्यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाकूर यांच्या कंठवली येथे निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.







