| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगडच्या रणरागिणी, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (दि.29) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राजकीय, सामाजिक, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधील दिग्गज मंडळी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिलांची अलोट गर्दी केली होती. गेल्या आठ दिवसांपासून पेझारी येथील सुशीला सदनमध्ये कार्यकर्त्यांनी बहरून गेला आहे.
माजी खा.अनंत गीते यांनी शुक्रवारी पेझारी येथे जाऊन पाटील कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, मिनाक्षी पाटील यांच्या स्नुषा चित्रा पाटील, नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, सवाई पाटील, सुमन पाटील, राजन पाटील, नीता पाटील, आदी पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी आ. भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे, माजी आ. विनय नातू, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा परिषद मााजी सदस्य द्वारकानाथ नाईक, संजय पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, भाजपचे तालूका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, चेंढरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच यतीन घरत, कुर्डूसचे माजी सरपंच संदीप पाटील, व्यवसायिक केशव पुजारी, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील आदी मान्यवर, शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.