जयंत पाटील यांच्याकडून डामसे कुटुंबियांचे सांत्वन

| नेरळ | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे यांच्या मातोश्री फसाबाई डामसे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी कर्जत कोठिंबे येथे जाऊन डामसे कुटुंबियांचे सांत्वन केले.

नारायण डामसे हे शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातात. कोठिंबे येथील डामसे यांच्या निवासस्थानी जाऊन जयंत पाटील यांनी सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत तालुका चिटणीस श्रीराम राणे, रायगड जिल्हा बँकेचे संचालक तानाजी मते, माजी संचालक आणि कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश फराट, माजी सभापती गजानन पेमारे, युवक तालुकाध्यक्ष महेश म्हसे, विभाग चिटणीस पांडुरंग बदे, मंगेश खडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version