| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात मंगळवारी (दि.15) भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम घेण्यात आले. उप प्राचार्य व एनएसएस कार्यक्रम अधिकारी किशोर लहारे यांनी डॉ. कलाम यांचे ‘जीवन चरित्र’ कथन केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल सागर कुंभार यांनी कलाम यांच्या जीवनावर ऑनलाईन प्रश्नमंजुशा व ग्रंथप्रदर्शन 12 तास वाचन आयोजित केले होते.