महसूल पंधरवडा सप्ताहाचे आयोजन

| चिरनेर | प्रतिनिधी |

चिरनेर येथे उरण तालुका कृषी अधिकारी ऋतुजा नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.5) महसुल दिन व केंद्र शासनाच्या जीसीएफ प्रकल्पातून भारताच्या तटीय समुदायांची हवामान लवचिकता वाढविणे या अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी कृषी विभागामार्फत या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध माहिती देण्यात आली. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. जीवन अरेकर, मत्स्य प्रकल्पाचे समीर कोलथकर, नरेश म्हात्रे, मंडळ कृषी अधिकारी श्री जोशी, तलाठी श्री पिरकर, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, कृषी सहाय्यक सुरज घरत यांच्यासह कृषी अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version