| चिरनेर | वार्ताहर |
कृषी विभागामार्फत माहिती देण्यासाठी बुधवार (22) चिरनेर येथे ग्रामपंचायत कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान टेरेंजिअस कंपनीचे प्रकल्प समन्वयक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुका अधिकारी किसन शिगवण यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, विमा योजना तसेच विविध अवजारे घेण्या विषयीचे मार्गदर्शन केले. तर पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे यांनी शेती उत्पन्न वाढीवर मार्गदर्शन केले. कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी शेतकर्यांना भेडसावणार्या समस्या अधिकार्यां सोमोर मांडल्या. दरम्यान या सभेला चिरनेर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कविता यांनी आभार व्यक्त केले.