। माणगाव । प्रतिनिधी ।
शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार (दि.14) सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत जुने एसटी स्टँड जवळील महेंद्र मेथा यांच्या सभागृहात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा लाभ समाजातील सर्व गरीब गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन उद्योजक विजयशेठ मेथा यांनी केले आहे.
या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणार्या रुग्णांनी येताना सोबत आधार कार्ड व रेशन कार्ड याची झेरॉक्स प्रत आणावी. तसेच, मधुमेहाची व रक्तदाबाची औषधे सुरु असल्यास तीदेखील घेऊन यावीत. रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी जाण्याची, राहण्याची, जेवणाची व परत आणून सोडण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी विधिता मेथा (8698740640) सुप्रिया शिंदे (9049665598) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.