एचआयव्ही संक्रमित महिलांसाठी संमेलन

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
आधार विहान प्रकल्प पनवेल यांच्या वतीने व युनायटेड वे इंडियाच्या विद्यमाने, पंचायत समिती हॉल, पनवेल येथे एचआयव्ही संक्रमित महिलांसाठी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात काही संक्रमित महिलांनी आपले अनुभव कथन केले. युनायटेड वे इंडिया तर्फे जुही जस्वाणी यांच्या हस्ते उपस्थित महिलांना हायजेनिक मेडिकल किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी रायगड, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था संजय माने, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, वैद्यकीय अधिकारी, धीरूभाई अंबानी ए.आर.टी सेंटर,पनवेल डॉ.पर्णा बारडोलोई, समोपदेशक, धीरूभाई अंबानी ए.आर.टी.सेंटर, पनवेल, समोपदेशक, आय.सी.टी.सी.सेंटर, पनवेल, तारा इंगळे, विकास कोंपले प्रकल्प संचालक, विहान प्रकल्प पनवेल, दिलीप विचारे अध्यक्ष आधार संस्था श्रद्धा जाधव, वरिष्ठ अधिकारी, युनायटेड वे इंडिया जुही जस्वाणी आदी उपस्थित होते.

Exit mobile version