परीक्षा केंद्रावर पुन्हा गोंधळ

। मुंबई । वृत्तसंस्था । आरोग्य विभागाच्या विविध रिक्त पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पुणे आणि नाशिक केंद्रांवर गोंधळ उडाला. या केंद्रांवर प्रश्‍नपत्रिका कमी आल्या, तर काही ठिकाणी उशिरा मिळाल्या अशी उमेदवारांची तक्रार होती. याचा फटका रायगड जिल्ह्यातील परीक्षार्थींनासुद्धा बसला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. परीक्षेच्या गोंधळाबाबत राजेश टोपे यांनी नाशिक, पुणे केद्रांवर प्रश्‍नपत्रिका ज्या बॉक्समधून देण्यात आल्या होत्या, त्या डिजिटल बॉक्सचे लॉक उघडण्यास उशीर झाला. हा दहा मिनिटांचा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना तितका अतिरिक्त वेळ पेपर लिहिण्यास देण्यात आल्याचे सांगितले.

Exit mobile version