| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मतदान केंद्रात बसून आपल्या उमेदवाराच्या चिन्हाचा प्रचार करत असल्याचे लक्षात आल्यानंतर दुसर्या पक्षाच्या पदाधिकार्यांनी याला आक्षेप घेतल्याने कामोठेमधील मतदान केंद्रात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कामोठे वसाहतीमधील सुषमा पाटील विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात हा प्रकार घडला असून, सर्वत्र शांततेत मतदान पार पडत असताना घडलेल्या या घटनेमुळे मतदान प्रक्रियेला गालबोट लागले आहे. भाजपाच्या काही महिला पदाधिकारी महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण या चिन्हाचा प्रचार करत असल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षाच्या पदाधिकार्यांनी याला आक्षेप घेतल्यावर हा गोधळ झाल्याचा आरोप विरोधी पक्षातील पदाधिकार्यांनी केला असून, तशा प्रकारची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमानवर प्रसारित करण्यात आली आहे.