सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणात आम. नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून, अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
नितेश राणे प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी नोटीस बजावली होती तसेच दुपारी 3 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितलं होते. मात्र, राणे हजर न झाल्याने ही नोटीस नारायण राणे यांच्या घरावर चिटकविण्यात आली. दरम्यान, या प्रकरणावरील सुनावणी आता गुरुवारी (दि.30) होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून न्यायालयात नेमके काय घडते ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर बुधवारी सुनावणीदरम्यान पोलिसांकडून सहा फोटो सादर करण्यात आले. यामध्ये एका फोटोत सीसी टीव्हीमध्ये दोन संशयित दिसत असल्याचा दावा सरकारी पक्षाकडून करण्यात आला तसेच यावेळी सरकारी पक्षाकडून न्यायालयात सर्वोच्च न्यायालाच्या निकालाचे संदर्भ देण्यात आले. दरम्यान, सरकारी वकील आणि नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांच्यात यावेळी शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी देसाई यांनी सरकारी वकील जाणूनबुजून वेळ काढत असल्याचे म्हटले यावर सरकारी वकील घरत यांनी आक्षेप घेतला.
सरकारला राज्यात घडणार्या अपराधांकडे तसेच इतर घडणार्या गुन्ह्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही आहे मात्र, नारायण राणे यांच्या घरी जाऊन नोटीस देण्यास सरकारला वेळ आहे.
देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते