नवी नियमावली जाहीर
मुंबई | प्रतिनिधी |
थर्टी फर्स्ट,नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी आयोजित करताय का? थांबा थोडं कारण सरकारने पार्टीसाठी नो झिंगाटचा इशारा दिलेला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य शासनानं नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये खबरदारी म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र न येता यंदा हे सोहळे अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे, असं या नियमावलीत म्हटलं आहे.
नवीन नियमावली
1) नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच साधेपणानं सोहळा करावा.2) 25 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचं काटेकोरपणे पालन व्हावं.3) बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत तर खुल्या जागेत 25 टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. 4) गर्दी न होता सोशल डिस्टंसिंगचं पालन व्हाव. मास्क, सॅनिटायझरच्या वापराकडं विशेष लक्ष, 5) 60 वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षांखालील मुलांनी घरीच रहावे,6) नागरिकांनी समुद्र किनारे, बागा, रस्त्यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करु नये. 7) मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आदी ठिकाणी गर्दी करु नये.8) धार्मिक-सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन नाही.9) 1 जानेवारी रोजी बहुसंख्य लोक धार्मिकस्थळी जात असतात. अशा ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे.10) फटाक्यांची आतषबाजी करु नये, ध्वनिप्रदुषणच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन व्हावं.