| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत पक्षसंघटनेवर भर देण्यात आला. येत्या काही दिवसात तालुक्याचा दौरा करून असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्रित करून विविध पदांवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः सहकार विभागाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरले असून, पक्ष संघटना सक्षम करण्याचा निर्धार करण्यात आला.
आमराई येथील आशीर्वाद सभागृहात काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय इंदिरा गांधी व माजी आमदार स्व. तुकाराम सुर्वे यांना अभिवादन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संजय गवळी, माजी तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, प्रदेश प्रतिनिधी मुकेश सुर्वे, जिल्हा सरचिणीस संदीप सोनटक्के, नेरळ शहर काँग्रेस अध्यक्ष आनंद मोडक, उमरोली जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष बळीराम काळोखे, गोपीनाथ देशमुख, सुभाष मदन, संदीप पाटील आदी उपस्थित होते. कर्जत शहर अध्यक्ष अनंत देवळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश सांगितला. शेवटी आनंद मोडक यांनी आभार मानले.