लहुळसेतील शिवसैनिकांचा काँग्रेस प्रवेश

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील लहुळसे गाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून तालुक्यात सर्वपरिचित असून, गेल्या अनेक वर्षे या गावात काँग्रेसचे बूथ लागत नव्हते. मात्र, शुक्रवारी पोलादपूर शहरातील मैत्री हॉलमध्ये आयोजित सभागृहामध्ये लहुळसे गावातील शिवसैनिकांनी महाड विधानसभा काँग्रेसचे नेते हनुमंत जगताप यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव स्नेहल माणिक जगताप, धनंजय देशमुख, अजय सलागरे, शैलेश सलागरे, दिलीप भागवत, अनंत पार्टे, अमोल भुवड, प्रवीण महाडिक इत्यादी प्रमुख पदाधिकारी, सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी लहुळसे गावातील संभाजी रिंगे, अशोक रिंगे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

Exit mobile version