नगरपंचायतीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

मंत्री वडेट्टीवारांच्या उपस्थितीत बैठक
माणगाव | प्रतिनिधी |
रायगडातील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली असून,त्याचाच एक भाग म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे नगरपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. माणगावमध्ये गुरुवारी 18 नोव्हेंबर रोजी आगमन होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
माणगाव सिद्धी नगर येथील ज्ञानदेव पवार यांच्या निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता ना.विजय वडेट्टीवार हे येणार्‍या माणगाव नगरपंचायत निवडणुकीचा आढावा घेऊन कार्यकर्त्याना मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीला जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत,प्रदेश काँग्रेस निरीक्षक चारुशीला टोकस, सरचिटणीस स्नेहल जगताप, रेखा मिरजकर, अ‍ॅड.श्रद्धा ठाकूर, विलास सुर्वे, कीर्ती भोनकर, डॉ.मुईज शेख, खेळू वाजे, विजय तोडणकर, बाबू पाखुर्डे, काशीराम पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version