| माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायतीची दुपटीने केलेली नळपाणीपट्टी दरवाढ, डम्पिंग ग्राउंड, जुने माणगावकरांना अशुद्ध पाणी पुरवठा, प्लास्टिक पिशवी बंदी अशा विविध प्रश्नांविरोधात सलीम मुबारक शेख हे (दि.1) नगरपंचायत कार्यालयाजवळ बेमुदत उपोषणास बसणार होते. त्याआधी सोमवार (दि.31) सायंकाळी नगरपंचायत प्रशासन व नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व त्यांचे सहकारी यांच्यासमवेत या भेडसावणार्या विविध प्रश्नासंदर्भात शेख व त्यांना पाठिंबा देणारे विविध पक्षातील कार्यकर्ते, संस्था, संघटना यांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नगरपंचायत प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पत्रकार शेख यांनी (दि.1) आपल्याला पाठिंबा दिलेल्या सर्वांना विश्वासात घेऊन हे उपोषण तूर्तास मागे घेत घेत असल्याचे सांगितले.