चिपळूणमध्ये काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान

। चिपळूण । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणीला सोमवारी चिपळूण शहरामधून प्रारंभ झाला. प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून डिजिटल सदस्यता नोंदणी अभियान सुरुवात करण्यात आले असून, हे अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातून मोठे योगदान देऊन देशात सर्वात जास्त सदस्य नोंदणी महाराष्ट्रातून करू, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. याबरोबरच कोकण प्रभारी अध्यक्ष संदीप बी. एन. यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार काँग्रेसच्या डिजिटल सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. यानुसार या अभियानाचा शुभारंभ सोमवारी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांच्या हस्ते आणि प्रदेश सरचिटणीस इब्राहिम दलवाई यांच्या पुढाकाराने करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सुरेश पाथरे, सोनललक्ष्मी घाग, मीडिया रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, महिला आघाडी शहराध्यक्षा श्रद्धा कदम, जिल्हा उपाध्यक्षा आश्‍विनी भुस्कुटे, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून अधिकाधिक सदस्यता नोंदणी करण्याचा निर्धार सर्वांनीच व्यक्त केला.

Exit mobile version