| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील भाजपा कार्यकर्ते-पदाधिकारी आणि नेतेमंडळींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर परखड शब्दांत टीका केली. तसेच, ब्रिटिशांनी जाताना जनतेला गुलाम बनवण्याची मानसिकता यांच्या मनात सोडली, असंही मोदी म्हणाले. हे सगळे लोक वंशवाद, परिवारवाद, जातीवाद, श्रेत्रवाद याचे बंधक झाले आहेत. भाजपाची राजकीय संस्कृती प्रत्येक देशवासीयाला सोबत घेऊन चालण्याची आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती छोटा विचार करायचा, छोटी स्वप्नं बघायची आणि त्याहून छोटं यश मिळवून आनंद साजरा करायचा, एकमेकांची पाठ थोपटायची अशी आहे. भाजपाची राजकीय संस्कृती मोठी स्वप्नं बघणं आणि त्याहून जास्त मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत करणं ही आहे, असा टोला मोदींनी यावेळी लगावला.