चुलीवर चहा करून काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

। कर्जत । वार्ताहर ।

कर्जत शहरामधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. घरगुती गॅसच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्याने आंदोलन स्थळी महिला कार्यकर्त्या ज्योती जाधव यांनी चूल पेटवून चहा केला.

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस चे वाढते दर, सर्वच बाबतीत महागाई, इडीचा गैर वापर आदींसाठी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाला जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. घरगुती गॅसचे दर वाढल्याने चूल पेटवून चहा तयार करून आंदोलनाची सुरुवात केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले. यावेळी रायगडच्या सहप्रभारी राणी अग्रवाल, किरीट पाटील, शिवाजी खारीक, अनंत देवळे, धनंजय चाचड, अरविंद पाटील, संजय गवळी, विजय हरिश्‍चंद्रे, प्रमोद राईलकर, चंद्रकांत मांडे, अरविंद कटारिया, हेमंत देशमुख आदी उपस्थित होते.

Exit mobile version