| उरण | वार्ताहर |
नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याने या अन्याय कारक निर्णया विरोधात व राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ तालुक्यातही काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे आदींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केले. यावेळी मिलिंद पाडगावकर, किरीट पाटील, मार्तंड नाखवा, कमलाकर घरत, केशव घरत, संध्या ठाकूर, रेखा घरत, निर्मला पाटील, भारती कांबळे, गोपीनाथ मांडेलकर, अशोक भगत, वैभव ठाकूर, अफशा मुकरी, सदानंद पाटील, अमीना पटेल, दीपक ठाकूर, योगसाधना पाटील, मंगेश म्हात्रे, शंकर ठाकूर आदी उपस्थित होते.