महाडमध्ये काँग्रेस पुन्हा सक्रिय होणार

हनुमंत जगताप यांचा निर्धार, कार्यत्यांची बैठक
। महाड । प्रतिनिधी |

महाड विधानसभा मतदारसंघातील माणगाव, पोलादपूर आणि महाड या तीन तालुक्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने अनेक दिवसांपासून सुप्त असलेला काँग्रेस पक्ष सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते हनुमंत जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या माध्यमातून सामान्य माणसाचे प्रश्‍न सोडवणार असून त्यासाठी मतदारसंघांमध्ये 25 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी थेट जनतेशी संपर्क साधणार असल्याचे सांगून त्यासाठी तिन्ही तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. या कमिटीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी राजू कोरपे, धनंजय देशमुख, भाऊ दिविलकर, पांडुरंग निवाते, मुन्ना खांबे, सुनील जाधव, श्रीधर सकपाळ आधी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यापुढे मार्गदर्शन करताना जगताप म्हणाले, तालुक्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर आहे. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये डावलले जात आहे. तसेच रस्त्यांच्या अवस्था दयनीय आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामीण समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे त्या समस्या जाणून घेऊन संबंधित यंत्रणेकडून समस्या सोडवण्याचा कमिटी प्रयत्न करेल. धरणाचे प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण आहेत. या प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version