। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर कॉग्रेसने आपले संपूर्ण लक्ष मिशन गुजरातवर केंद्रित केले आहे. या अंतर्गत, पक्ष येत्या 15 दिवसांत एकूण 25 मेगा रॅली काढणार असून त्यामध्ये 125 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
कॉग्रेसच्या या रॅली आक्रमक निवडणूक रणनीती अंतर्गत असतील, ज्यामध्ये पक्षाचे सर्व बडे नेते सहभागी होतील. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत.