किल्ले गुमतारावर संवर्धनाचे कार्य सुरु; सह्याद्री प्रतिष्ठानाचा उपक्रम

। कर्जत । वार्ताहर ।
सह्याद्री प्रतिष्ठान संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनाचे कार्य गेल्या 14 वर्षापासून करत आहे. संस्थेची स्थापना श्रमिक गोजमगुंडे यांनी केली आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील दुर्गसेवकांना गडकोट संवर्धन जनजागृतीसह संवर्धन मार्गदर्शन होत आहे. संस्थेमार्फत आजवर तटबंदी बुरुज बांधकामासोबत गडकिल्ल्यांवर लोकवर्गणीतून सागवानी प्रवेशद्वार आणि तोफगाडे बसविण्यासोबत विविध सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणवर होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये असणारा किल्ले गुमतारा येथे संस्थेमार्फत सन 2015 पासून दुर्गसंवर्धन कार्य सुरु आहे. किल्ल्याच्या वाटा शोधणे दिशा दर्शक, सूचना फलक व स्थळ दर्शक लावणे या कामांसोबत टाके स्वच्छत, प्रवेशद्वार जवळील निसरड्या वाटेची दुरुस्ती करणे, नैसर्गिक जलस्त्रोत्र ट्रेकर पर्यंत पोहचविणे इत्यादी कामे स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या हा किल्लासहकार्याने नियमित स्वरुपात सुरु आहेत. गडाचे बांधकाम मध्ययुगीन कालखंडातीलअसून घनदाट जंगलात वनदुर्ग या प्रकारत मोडतो गडावरील तटबंदी बुरुज ढासळलेले असून सद्य स्थितीत जे आहेत ते जतन करण्याचे कार्य संस्थेकडून होत आहे. अशी माहिती अक्षय पाटील, सागर पाटील यांनी दिली.


नुकतीच सह्याद्री प्रतिष्ठानच्या ठाणे व भिवंडी विभागअंतर्गत संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत किल्ल्यावरील झुडपांनी व मातीने बुजलेले पाण्याचे टाके, तटबंदी बुरुजावरील अतिरिक्त झुडपे काढून महादरवाजातील दगड उचलून पायवाट दुरुस्त करण्यात आले. गुमतारा तसेच ठाणे जिल्ह्यातील गडकोटांवर संस्थे मार्फत संवर्धन कार्य सुरु असून जिल्ह्यातील शिवप्रेमींनी या कार्यत सहभागी व्हावे असे आव्हान महेश वीरणेकर यांनी केले.
या मोहिमेत सुयोग जगे,तुषार धुधाले,महेश माने,अक्षय तटकरे,रोशन पाटील,साईनाथ भेरे,योगेश पाटील,भावेश ढेसले,दयानंद डोंगरे,रोहित जाधव,मयूर चौधरी तसेच शहापूर,मुरबाड आणि मुंबई विभाग या विभागांची उपस्थिती लाभली.

Exit mobile version