। वाघ्रण । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्तै श्रीधर बाळाराम पाटील उर्फ केसरीनाथ बागवाले यांचे नुकातच निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखदप्रसंगी मायेचा आधार देण्यासाठी शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते आ.जयंत पाटील यांनी भेट देत त्यांचे सांत्वन केले आहे.
याप्रसंगी अनिल पाटील, अॅड.प्रमोद पाटील, सत्यविजय पाटील उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून नामख्यात असणारे श्रीधर पाटील उर्फ केसरीनाथ बागवाले यांनी विविध संस्थांचे नेतृत्त्व यशस्वीपणे सांभाळले होते. त्यांच्या पश्चात रुपेश पाटील, परेश पाटील ही दोन मुले, पत्नी इंइूमणी पाटील याशिवाय अन्य पारिवारिक सदस्य असा मोठा परिवार आहे.