शेकापचे निष्ठावंत वजूभाऊ सादराणी यांचे निधन

आ.जयंत पाटील यांच्याकडून सांत्वन
। पनवेल। वार्ताहर।
शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहरातील निष्ठावान कार्यकर्ते वजूभाई सादराणी यांचे नुकतेच वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झाले. अखेरच्या श्‍वासापर्यंत वजू भाई लाल बावट्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.वजुभाई यांची लालबावट्याशी असणारी निष्ठा शेकाप कदापि विसरणार नाही,असे जयंत पाटील यांनी नमूद केले.

यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, तालुका चिटणीस राजेश केनी, माजी नगरसेवक सुनील गोविंद बहिरा, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, रमाकांत म्हात्रे, सूनील मोकल, अवधूत पाठारी आदी उपस्थित होते.

Exit mobile version