पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
| मुंबई | प्रतिनिधी |
सलमान खानच्या घरावर गोळीबारनंतर पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. सलमान खानला मारण्याचा आणखी कट लॉरेंन्स बिश्नोई गँगने आखला होता. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेंन्स बिश्नोई गँगनं सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊस आणि त्याच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. त्याचप्रमाणे सलमानच्या घरावर किंवा तो गाडीतून येईल तेव्हा त्याच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. या प्रकरणात आता पनवेल शहर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्ह्यातील आरोपींनी सलमान खानचा खून करण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच गुन्ह्यातील आरोपी हे मुख्य आरोपीत लॉरेंन्स बिष्णाोई व अनमोल बिष्णाोई यांच्या संपर्कात आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सलमान खान काम करत असलेल्या ठिकाणची व सलमान खान याच्या फार्म हाऊसची रेकी केल्याचंही तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.