| अलिबाग | वार्ताहर |
26 नोव्हेंबर रोजी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रा.से.यो. विभाग, डी.एल.एल.ई, राज्यशास्त्र विभाग यांच्यामार्फत महाविद्यालयात संविधान दिन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. प्रितीजा राऊळ यांनी उद्देश पत्रिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. हर्षदा पुनकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून प्रा. अविनाश ओक, अलिबाग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रा.ओक यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, राज्यघटना, तिचा वापर, महत्त्व, अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य लिना पाटील यांनी कार्यक्रमात आपल्या मनोगतप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन गोंधळी, प्रा. प्रवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य लिना पाटील यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य लीना पाटील, आय.क्यू.एस.सी कोऑर्डिनेटर प्रा. श्रद्धा पाटील, डी.एल.एल.ई विभाग प्रमुख प्रा. प्रितीजा राऊळ, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. हर्षदा पुनकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तृप्ती खोत तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे नियोजन सावली कवळे, दिया पाताडे, एफ.वाय.बी कॉम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विनश्री भगत, एफ.वाय.बी.ए या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.