ॲड. कैलास मोरेंना ‌‘संविधानरत्न’ पुरस्कार

| वेणगाव | वार्ताहर |
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव-दाभाडे, जि. पुणे यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीला 5 जुलै 2023 रोजी 100 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने कायद्याचे रक्षक-राज्यस्तरीय 100 नामांकित वकिलांना संविधान रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कर्जत तालुक्यातील ॲड. कैलास मोरे यांनाही रविवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी वडगाव-मावळ येथे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कर्जतमधील अनेक प्रश्न मार्गी लावणारे निष्णात वकील म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, असे कैलास मोरे सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल त्यांचे सर्व सामाजिक, राजकीय स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version