संविधान घरोघरी आवश्यक: देवरे

| नागोठणे | प्रतिनिधी |

बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांना गुलामगिरीतून मुक्त करणारे आहे. त्यासाठी आपण सर्वजण आपल्या घरात ज्या प्रमाणे विविध ग्रंथ ठेवतो त्याप्रमाणे एक राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान ग्रंथ हा आपल्या प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे असेही आवाहन प्रा. सुनिल देवरे यांनी केले.

नागोठणे येथे भारतीय रिपब्लिकन पक्ष व बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्र. 3 यांच्या विद्यमाने कोकण नेते व्ही. के. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सभेत प्रा. देवरे बोलत होते. यावेळी शांताराम गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, विलास चौलकर, बाळासाहेब टके, सचिन मोदी, सिराज पानसरे, सुनील लाड, दिनेश घाग, किसन शिर्के, विलास कांबळे, संतोष गायकवाड, प्रभाकर ओव्हाळ, प्रकाश कांबळे, नरेश गायकवाड, सुरेश गायकवाड, रुपाली कांबळे, राजश्री दाभाडे यांच्यासह समाज बांधव तसेच आंबेडकर अनुयायी व नागोठणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version