| नागोठणे | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विनाकारण गलिच्छ भाषेत शिंतोडे उडविल्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे, संपूर्ण भारत देशातील बौद्ध समाज बांधव भडकलेले असून, ठिकठिकाणी जगदीश गायकवाड यांचा निषेध केला जात आहे. जगदीश गायकवाड यांना अटक करुन कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. त्याच अनुषंगाने बौद्धजन पंचायत समिती मुंबई नागोठणे विभागाच्या वतीने जगदीश गायकवाड यांचा निषेध करुन त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी आरपीआय कोकणचे नेते व्हि.के. जाधव, बौद्धजन पंचायत समितीचे विभागीय नेते चंद्रकांत गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, उपाध्यक्ष प्रभाकर ओव्हाळ, सचिव दिलीप दाभाडे, सहसचिव अरविंद गायकवाड, अॅड. प्रकाश कांबळे, हेमंत जाधव, विलास कांबळे, देवराम कांबळे, कुणाल गायकवाड, किसन शिर्के, पांडुरंग गायकवाड, सहदेव खंडारे आदींसह बौद्ध समाज बांधव बहुसंख्येने उवस्थित होते.