सभागृहाचे बांधकाम सुरु

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला येथे नगरपंचायतीच्या नागरी सुविधा योजनेतून 25 लाख रुपये खर्चाच्या अनुदानातून मंजूर झालेल्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम येथील जामा मस्जिद शेजारील जागेत नुकतेच सुरु करण्यात आले आहे. जुने माणगाव मस्जिद मोहल्ला येथे सामाजिक सभागृह साकारत असल्याने येथील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. जुने माणगाव मस्जिद मोहल्ला याठिकाणी सामाजिक सभागृह बांधण्यात यावा अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून येथील मुस्लिम बांधवांची होती.

Exit mobile version