। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील नेरळ रेल्वे स्थानकात मावळ लोकसभा मतदारसंघाचे खा.श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांसाठी लिफ्ट बसवले जाणार आहे. या लिफ्टचे फ्लॅट दोन वरील काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. नेरळ या जंक्शन रेल्वे स्थानकातून माथेरान करिता मिनीट्रेनचा नेरळ- माथेरान-नेरळ असा प्रवास सुरु होतो. त्यामुळे पर्यटक प्रवाशांची मोठी गर्दी या रेल्वे स्थानकात नेहमी असते. त्यात मध्य रेल्वेकडून मागील दोन वर्षात बनवण्यात आलेले पादचारी पूल यांची उंची ही महिला प्रवासी आणि वयोवृद्ध प्रवासी यांची दमछाक करणारी ठरत आहे. त्यामुळे नेरळ प्रवासी संघटना आणि स्थानिक प्रवाशांनी खा.श्रीरंग बारणे यांच्याशी संपर्क साधून नेरळ रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि लिफ्टची उभारण्याची मागणी केली होती. खा.बारणे यांनी शेलू रेल्वे स्थानकापासून लोणावळा स्थानकापर्यंत सर्व स्थानकांमध्ये वेगवेगळ प्रकल्प राबविण्याचा प्लॅन मंजूर करून घेतला आहे. त्यातून नेरळ रेल्वे स्थानकात पहिल्या टप्प्यात लिफ्ट उभारले जाणार आहे. या लिफ्टमुळे नेरळ रेल्वे स्थानकातून प्रवास करणार्या प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे जाणार आहे.