माथेरान शटल सेवेत रेल्वेची बनवेगिरी


प्रवासी डब्बा तात्काळ लावण्यात यावा, प्रवासी डब्बा तात्काळ लावण्यात यावा
। नेरळ । वार्ताहर ।
मिनिट्रेनची माथेरान-अमन लॉज-माथेरान या शटल सेवेची वाहतूक करणार्‍या रेल्वे प्रशासनाने बनवेगिरी सुरू केली आहे.पर्यटक प्रवाशांची गर्दी असताना देखील एक प्रवासी डब्बा कमी लावला जात असून तो माथेरान स्थानकात उभा ठेवण्यात आला आहे.दरम्यान,तो प्रवासी डब्बा तात्काळ लावण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
ऐनदिवाळी सिजन च्या तोंडावर शटल सेवेचा एक डब्बा कमी करण्यात आला.अमन लॉज ते माथेरान स्टेशन पर्यंतची रेल्वेची शटल सेवा पर्यटक आणि स्थानिकांसाठी मोठी सुलभ व फायदेशीर ठरली आहे सुरवातीला पाच सेकंड क्लास च्या डब्ब्यानी सुरू केलेली मिनी ट्रेनची शटल सेवा तीन डब्यांवर आली होती गेल्या आठवड्या पासून आणखी एक डब्बा कमी केल्याने अवघे दोन सेकंड क्लासचे डब्बे लावून गाडी चालवली जात आहे 90 प्रवाश्यांच्या ऐवजी केवळ 60 प्रवाशीच प्रवास करू शकतात.

माथेरान शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी अध्यक्ष मनोज खेडकर यांच्या सहीचे पत्रा सोबत माथेरान रेल्वेचे स्टेशन मास्टर जी एस मीना यांची भेट घेऊन तात्काळ डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली . या वेळी नगरसेवक शिवाजी शिंदे, महिला काँग्रेस अध्यक्षा वर्षा शिंदे, नागरी पत संस्थेचे सभापती हेमंत पवार, धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकले सामाजिक कार्यकर्ते नितीन शाह आदी उपस्थित होते.
माथेरानला वाहन बंदी आहे टॅक्सी स्टँड गावा पासून तीन किलोमीटर दूर असल्याने मिनी ट्रेन ची शटल सेवा सर्वांना सुलभ आहे लवकरच दिवाळी सिजन सुरू होत आहे डब्यांची संख्या वाढली पाहिजे काँग्रेस पक्षाच्या मागणीची दाखल डी आर एम ऑफिस ने घेतली असून मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी लवकरात लवकर नेरळ यार्डात डबे माथेरानला पाठवण्यात येतील असे सांगितले.

Exit mobile version