वरचा देऊळवाडा ग्रामस्थांचा विधायक उपक्रम

स्मशानभूमीची साफसफाई, परिसरात वृक्षारोपण

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

पालीतील वरचा देऊळवाडा येथील ग्रामस्थ मंडळ यांनी येथील स्मशानभूमीची साफसफाई व परिसरात वृक्षारोपणाचे विधायक सामाजिक कार्यक्रम नुकतेच राबवले आहे.

या वृक्षारोपणाकरीता स्थानिक नगरसेविका मधुरा अमीर वरंडे यांनी नगरपंचायत पालीमार्फत 50 वृक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. तसेच गावातील वयोवृध्द व तरुणांनी या कामात खूप मेहनत घेतली. भर पावसात त्यांनी कामे केली. उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा जोपासत एक आदर्श घालून दिला आहे. या विधायक उपक्रमासाठी राजाराम चव्हाण ( 86), आप्पा चव्हाण, विठोबा गायकवाड, विनायक राऊत, अमित वरंडे, अविनाश अशोक दंत, सुरेश गायकवाड, शुभम वरंडे, आर्यन जाधव, गौरव वाघमारे, संदेश वरंडे, सर्वेश राऊत, सूरज वरंडे या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली.

Exit mobile version