। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन नगरपरिषदे कडून पाणीपट्टी थकबाकी असलेल्या ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात आली असुन वारंवार सुचना देऊन पाणीपट्टी भरण्याकडे दिरंगाई करणार्या ग्राहकांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई पथकाकडून सुरू करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या कर्मचार्यांकडून थकबाकी असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी धारकांना वारंवार सुचना देऊन सुध्दा थकबाकी असलेल्या ग्राहकांनी सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नगरपरिषदे मार्फत कडक कारवाईची अंमलबजावणी सुरू झाली आहे.पाणीपट्टी थकबाकी असलेल्या ग्राहकांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू झाली असून विकास वागवेकर, प्रणय ठाकूर, अजय वडके, प्रवीण जाधव, सचीन घाडगे, रुपेश श्रीवर्धनकर, वीरेंद्र वाणी, अमर गुरव, नरेश काप, किरण पवार ह्या नगरपरिषदेच्या पथकाकडून कारवाई सुरु झाली आहे.







